पुणे – अनेकांना रात्री झोप येत नाही. झोप येण्यासाठी अनेकजण गाणी ऐकतात. गाणी ऐकत ऐकत त्यांना झोप येते. पण अडचण अशी असते की झोपल्यावरही गाणे चालूच राहते. अगदी कोणीतरी उठून बंद करेपर्यंत.
अशा परिस्थितीत असे होते की झोपी गेल्यावरही गाणी वाजत राहतात, त्यामुळे ऐकणाऱ्या लोकांची झोप मोडते. दुसरीकडे, सतत संगीत वाजवल्यामुळे इतर लोकांनाही झोपायला त्रास होतो. हे टाळण्यासाठी यूट्यूबने युजर्ससाठी उत्तम फीचर्स आणले आहेत. त्यामुळे या समस्या पूर्णपणे दूर होतील.
युट्युबने आपल्या युजर्सच्या समस्या सोडवण्यासाठी एक उत्तम उपाय योजला आहे. या आश्चर्यकारक फीचरच्या मदतीने, जेव्हा लोक गाढ झोपेत जातात तेव्हा गाणे आपोआप थांबेल. तुम्ही झोपण्यासाठी गाणे लावल्यानंतर, गाढ झोपी जाताच गाणे आपोआप बंद होईल.
या फीचरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल अपडेट करावा लागेल. त्यानंतरच तुम्ही या फीचर्सचा वापर करू शकाल. या नवीन फीचरचे नाव स्लीप टाइमर आहे. संगीत ऐकत असताना, ओव्हरफ्लो मेनू बटणावर टॅप करा. यानंतर, तुम्ही मेनूमधून नवीन स्लीप टाइमर सेट करू शकता.
नवीन फीचरमध्ये युजरला पाच ते 60 मिनिटांच्या टायमरचा पर्याय मिळतो. तुम्हाला झोपायला किती वेळ लागतो त्यानुसार तुम्ही टायमर सेट करू शकता. वापरकर्ते संगीत ऐकताना कधी झोपी जातील त्यानुसार योग्य वेळ निवडू शकतात.