World Cup 2023 IND vs ENG Match Toss Update : विश्वचषक 2023 स्पर्धेतील 29 वा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. इंग्लंड टीमनं टॉस जिंकून घेतलेला बॉलिंगचा निर्णय त्यांच्या बालर्सने पहिल्या पंधरा ओव्हरमध्येच सार्थ करून दाखवला.
पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाची (Team India) सुरुवात खराब झाली. चौथ्या षटकात २६ धावांवर भारताला पहिला धक्का बसला. इनस्विंग बॉलवर ख्रिस वोक्सने शुभमन गिलला (Shubhaman Gill) क्लीन बोल्ड केले. शुभमनला 13 चेंडूत 9 धावा करता आल्या.त्यानंतर मैदानावर विराटची एंट्री झाली.
त्यानंतर 27 च्या स्कोअरवर टीम इंडियाला दुसरा धक्का बसला आहे. विराट कोहली (Virat Kohali) खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. कोहली आठ चेंडूत खाते उघडू शकला नाही. नवव्या चेंडूवर शॉट मारण्याचा प्रयत्न करत असताना झेल बाद झाला. सात षटकांनंतर भारताची स्थिती धावसंख्या दोन गडी गमावून २८ धावा होती. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि कर्णधार रोहित शर्मा क्रीजवर आले.
पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने शानदार गोलंदाजी केली. त्यांनी केवळ 35 धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या. 12व्या षटकात 40 धावांवर भारताला तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर १६ चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तो मार्क वूडच्या हाती ख्रिस वोक्सकरवी झेलबाद झाला. 12 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा होती. त्यानंतर रोहितला साथ देण्यासाठी मैदानात केएल राहुल आला.
काहीशी हळू सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलने भारताचा डाव सावरण्यासाठी संयमी बॅटिंग केली. 20 ओव्हरपर्यंत टीमची धावसंख्या 73 वर पोहचली होती. ज्यामध्ये रोहित शर्मा 44 वर तर केएल राहुल 16 वर खेळत होते.