मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत असताना तिकडे सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीच्या विरोधात पाटण्यात तक्रार दाखल केली आहे.
यातच मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा पोलिसांची चार जणांची टीम मुंबईला आली. मात्र रियाच्या घरी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा तिच्या राहत्या घरात उपस्थित नसल्याचे निदर्शनास आलं. रियाकडून अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचंही म्हटलं जात आहे. तसेच यासाठी तिने अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांना नेमलं आहे.
तत्पूर्वी,रियाने सुशांतकडून पैसे घेतले होते व तिने संपूर्ण कुटुंबाशी असलेले त्याचे संबंध तोडून टाकले होते. इतकेच नव्हे, तर तिनेच त्याला आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला आहे.