मुंबई – बॉलीवूड किंग खान म्हणजेच, अभिनेता ‘शाहरुख खान’ अनेक दिवसांपासून त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान 2023 मध्ये त्याच्या तीन चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. दिवाळीत शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला अभिनेत्याने त्याच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला होता. तेव्हा पासून त्याचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दरम्यान, अभिनेत्या जेव्हा पठाण चित्रपटाचा टिझर शेअर केला होता, तेव्हा पासूनच चित्रपटाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. अखेर आज चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.
या चित्रपटातुन शाहरुख खानतब्बल चार वर्षांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याचे चाहते या सिनेमाची आवर्जून वाट पाहत आहेत. तुम्ही जर चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात तर, संपूर्ण ट्रेलरमध्ये शाहरुखचा बोलबाला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम देखील अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत.
अॅक्शन आणि रोमान्सने पठाण चा ट्रेलर भरलेला आहे. शाहरुख आणि दीपिका दोघेही ट्रेलर मध्ये भरपूर ॲक्शन करताना दिसत आहेत. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री सुद्धा पाहायला मिळतेय. या दोघांशिवाय जॉन अब्राहमचा रावडी अंदाज ट्रेलर मध्ये दिसून येतोय. सध्या हा ट्रेलर सिनेरसिकांच्या पसंतीस पडत असून, अवघ्या वीस मिनिटातच ट्रेलरला एक मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.