पुणे – आज सकाळी कसबा पोट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली.मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळाले. कसबा मतदार संघामध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.प्रभावाच्या छायेत गेलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.मला विजयाची खात्री होती परंतु मी कुठेतरी कमी पडलो असं स्पष्ट मत रासने यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
“मला विजयची पूर्ण खात्री होती त्यामुळे माझ्यासाठी हा निकाल धक्कादायक आहे असं रासने यावेळी म्हणाले. २००९ पासून हा संमिश्र झालेला मतदारसंघ आहे. या मतदार संघांची रचना झाल्यापासून सिंगल फाईट या मतदार संघात पहिल्यांदाच झाली. आमच्या हक्काच्या मतदानात घट झाली” अस रासने यावेळी म्हणाले.
२०१४ मध्ये प्रत्येक पक्ष वेगळा लढला होता. आता यावेळी नेमकी कुठं मत कमी पडली हे पाहावं लागेल. तसेच जनतेला कन्व्हिन्स करायला मी स्वतः कमी पडलो असं मत रासने यांनी यावेळी व्यक्त केले.
अशी झाली फाईट
बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघामध्ये भाजपला पराभवाचा सामना करा लागला आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निर्णायक आघाडी घेतली. त्यामुळे भाजपला प्रभावाचा सामना करावा लागला. मतमोजणीपासून धंगेकर यांनी तब्बल 6 हजार 700 मतांनी आघाडी घेतली आहे. तर रासने यांना 50490 मतं मिळाली आहे. दरम्यान, 11 हजार 40 मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.