पुणे – शहरात रविवारी नव्याने 1,225 करोनाबाधित सापडले, तर 1,243 जण करोनामुक्त झाले. दिवसभरात करोनामुळे 38 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या एकूण 1,988 वर पोहचली आहे.
रविवारी दिवसभरात 4,868 संशयितांची तपासणी करण्यात आली. या तपासणी संख्येने चार लाखांचा टप्पा आज पार केला. यामध्ये आतापर्यंत 83 हजार 395 बाधित सापडले असून, त्यातील 66 हजार 589 करोनामुक्त झाले आहेत. सध्या विविध रुग्णालयांत 14,818 बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 803 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 493 जण व्हेंटिलेटरवर आहेत.