13 जणांचा मृत्यू : सात हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शहरात सात हजारहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहरात 757 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आजपर्यंत शहरात 41648 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 934 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज चार वाजेपर्यंत महापालिकेला प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात 757 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील 750 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 7 जणांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 6 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 41,648 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 7379 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 750 रुग्णांचाही समावेश आहे.
रविवारी दिवसभरात शहरात 11 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील काळेवाडी, चिंचवड, थेरगाव, निगडी, सांगवी येथील 6 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील जुन्नर, आंबेगाव, खेड, धानोरी येथील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू जाला. आज दिवसभरात 792 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 27,957 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2889 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 2451 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.