नवीदिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सध्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे. गुजरातमधील राजकोट येथे असताना केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजरातमध्ये आम्हाला खुप प्रेम आणि सन्मान मिळत आहे त्याबाबदल जनतेचे आभार केजरीवाल यांनी यावेळी मानले. तसेच जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही त्यांचा विश्वास जपू असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
आज रात्री मी सुरतला जाऊन तिथे गणपती बाप्पाची पूजा करणार आहे. सर्वांनी तिथे यावे, असे आवाहन जनतेला आहे. सर्वजण गुजरातसाठी प्रार्थना करतील. जेव्हापासून मनोज सोरठिया यांच्यावर हल्ला झाला आहे. आम्ही एक सर्वे केला ज्यामध्ये 12 पैकी 7 जागा ‘आप’च्या वाट्याला येत असल्याचे देखील केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सोरठिया यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधला. आम आदमी पार्टीचे लोक घाबरलेले नाहीत. आम्ही सरदार पटेलांचे अनुयायी आहोत असा थेट इशारा यावेळी केजरीवाल यांनी भाजपला दिला. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि आपमधील संघर्ष वाढत चालला आहे. त्या अनुषंगाने केजरीवाल यांनी नव्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिल्याचे पाहायला मिलत आहे.