भर चौकात प्रेयसीवर चाकूने वार 

पिंपरी – गेल्या पाच वर्षे एकत्र राहिलेल्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी प्रेम जुळत असल्याच्या संशयातून तरुणाने प्रेयसीवर भर चौकात वार केले. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास डांगे चौकात घडली. 20 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी विकास शांताराम शेटे (वय 21, रा. वाडा, खेड) या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील जखमी तरुणी व विकास एकाच गावातील असल्याने त्यांच्यात प्रेमसंबंध होते.

दोघे गेल्या पाच वर्षापासून एकत्र राहत होते. जखमी तरुणी ही डांगे चौकातील एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला आहे. विकासने घरच्यांच्या विरोधात जाऊन तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पाच वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडणे होऊ लागली होती. त्यामुळे, तरुणी काही दिवसांपासून वेगळी राहू लागली. दरम्यान विकासने तरुणीला एका अनोळखी तरुणासोबत पाहिले. विकासने त्या तरुणाला गाठून त्याचा मोबाईल हिसकावून त्यामधील संभाषण ऐकले होते. त्यानंतर विकासने मद्यपान करुन तरुणीवर चाकूने वार केले.

Leave A Reply

Your email address will not be published.