Myanmar – म्यानमारमध्ये लष्कराचे एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा लष्कराबरोबर संघर्ष करत असलेल्या बंडखोरांच्या गटाने केला आहे. देशाच्या उत्तरेकडील काचिन या अशांत भागात तैनात असलेल्या सैन्याला रसद पोचवणारे हे हेलिकॉप्टर सैन्याच्या तळावरून माघारी परतत असताना पाडले गेल्याचे काचिन इंडिपेन्डन्स आर्मीचे प्रवक्ते कर्नल नॉ बू यांनी म्हटले आहे.
हे हेलिकॉप्टर पाडले गेल्याच्या दाव्याबाबत लष्करी प्रशासन असलेल्या सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. हे हेलिकॉप्टर अत्यंत दुर्गम भागात पाडले गेले असल्यामुळे खात्रीशीर माहिती देणारा कोणी साक्षीदारही मिळू शकलेला नाही. मात्र तटस्थ माद्यमांच्या एका समुहाने हेलिकॉप्टर पाडले गेल्याचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यी हेलिकॉप्टर पाडल्यामुळे कितीजण ठार झाले हे समजू शकलेले नाही.
म्यानमारच्या सैन्याने २०२१ च्या फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय समन्वयक आंग सान स्यू की यांचे सरकार बरखास्त करून देशाची सत्ता हस्तगत केली. तेंव्हापासून सैन्याला देशातील बंडखोर गटांशी संघर्ष करावा लागतो आहे. हे गट प्रामुख्याने लोकशाहीबादी आणि अधिक स्वायत्ततेची मागणी करणारे वांशिक गट आहेत.
लष्कराच्यावतीने दुर्गम भागातील बंडखोरांच्या तळांवर
अधून मधून हेलिकॉप्टरमधून मारा केला जात असतो. २०२२ मध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरने डोंगराळ भागातील एका लोककला महोत्सवावर केलेल्या अशाच एका हल्ल्यामध्ये काचिन इंडिपेन्डन्स आर्मीचे ८० जण ठार झाले होते.