मुंबई – शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जालना सहकारी साखर कारखाना मनी लॉड्रिंग प्रकरणात विशेष पीएमएलए न्यायालयाने अर्जुन खोतकर आणि जुगलकिशोर तापाडिया यांना 12 जानेवारी 2024 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहे.
जालना साखर कारखान्याची निर्मिती 1984 साली झाली होती. तत्कालीन राज्य सरकारनं या साखर कारखान्यासाठी तब्बल 100 एकर जमीन विनामूल्य दिली होती. आता जवळपास 9 हजार भागधारक शेतकरी असलेला हा कारखाना तोट्यात आहे. यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून घेतलेले कर्जही थकीत आहे.