IND vs SA 2nd ODI Live Streaming : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाहुण्या संघाच्या बाजूने गेला. टीम इंडियाने जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेचा 8 गडी राखून पराभव केला. आता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात प्रोटीज संघाला ताकद दाखवावी लागणार आहे. त्याच्यासाठी हा ‘करा किंवा मरो’ चा सामना असेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा दुसरा एकदिवसीय सामना गकेबरहा शहरात खेळवला जाणार आहे. या शहरातील सेंट जॉर्ज पार्कमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना मंगळवारी म्हणजेच 19 डिसेंबर रोजी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत हा सामना दुपारी 2 वाजता सुरू होईल, परंतु भारतात तो 4.30 वाजता सुरू होईल. म्हणजेच नाणेफेक भारतीय वेळेनुसार 4 वाजता होईल आणि पहिला चेंडू 4.30 वाजता टाकला जाईल.
लाईव्ह मॅच कुठे पाहाल…?
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील इतर सामन्यांप्रमाणे हा सामनाही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल. या सामन्याचे थेट प्रवाह Disney + Hotstar अॅपवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे स्क्वाड…
भारत : रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार, आकाशदीप, युझवेंद्र चहल, रजत पाटीदार, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुनदर .
WTC Points Table (2023-2025) : पाकिस्तानच्या पराभवाचा Team India ला झाला असा फायदा…
दक्षिण आफ्रिका : रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जॉर्जी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुखवायो, केशव महाराज, तबरेझ शम्सी, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ओटोनी बार्टमन, मिहलाली पँगवा , व्हियान मुल्डर, काइल वेरेनी.
पहिल्या सामन्यात भारताचा एकतर्फी विजय…
17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात जलदगती गोलंदाज अर्शदीप आणि आवेश खान यांच्या दमदार गोलंदाजीमुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या 116 धावांत गुंडाळला होता. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांच्या झटपट अर्धशतकांच्या जोरावर भारताने अवघ्या 100 चेंडूत लक्ष्य गाठले आणि दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट्स राखून पराभव केला.