बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरलाही करोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत त्याने स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे. अर्जुनने पोस्टमध्ये लिहिले की, मी करोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे.
याबाबत माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पूर्णपणे ठीक आहे. मी स्वतःला होम क्वारंटाइन करून घेतले आहे. यासाठी मी डॉक्टर आणि बीएमसीचा सल्लाही घेतला आहे. मी माझे हेल्थ अपडेट आपल्याला देत राहीन.
अर्जुन कपूरच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याच्या प्रकृतीबाबत विचारणा केली आहे. तसेच त्याची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अर्जुनने आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. याचे काही फोटोही त्याने शेअर केले होते.
या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम, अदिती राय हैदरी आणि रकुल प्रीत सिंह हे मुख्य भूमिका साकारत आहे. सध्या याचे शूटिंग बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. हा चित्रपट भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, निखिल अडवाणी आणि जॉन अब्राहमसमवेत अन्य जण प्रोड्यूस करणार आहे.