पिंपरी – दोन्ही मुलीच कशा झाल्या, या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना दापोडी येथे घडली. याप्रकरणी पती, सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती इम्रान बशीर शेख (वय 27, रा. पवार वस्ती, दापोडी), सासरा बशीर शेख (वय 55), नूरजहा बशीर शेख (वय 48, दोघे रा. बोपोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत विवाहितेने शनिवारी (दि. 5) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या आई-वडिलांनी फिर्यादी यांच्या लग्नात चांगला मानपान दिला नाही. तसेच फिर्यादी यांना दोन्ही मुलीच कशा झाल्या यावरून त्यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. फिर्यादी यांनी घटस्फोटासाठी नकार दिला असता आरोपींनी विवाहितेचा छळ करून त्यांना क्रूर वागणूक देत त्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.