ब्युनोस आयर्स – लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाने फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यावर आता त्यांच्यासमोर मोठा धोका उत्पन्न झाला आहे. लाखो चाहते रस्त्यांवर येत संघाच्या विजेतेपदाच्या जल्लोषात सहभागी झाले होते. मात्र, चीनपाठोपाठ अर्जेंटिनामध्येही करोनाचे रुग्ण वाढत असतानाच जमलेली ती गर्दीच आता त्यांना भोवणार आहे.
#INDvsBAN | ‘सामनावीर’ कुलदीप यादवला संघातून बाहेर ठेवल्याने सुनील गावस्कर संतापले, म्हणाले…
ब्युनोस अयर्समध्ये संघाची मिरवणूक काढण्यात आली होती व त्यात लाखो चाहते जमलेले होते. त्याचबरोबर त्यांच्या देशात करोनाची प्रकरणेही सातत्याने वाढत असताना झालेली ही गर्दी त्यांच्यासाठी खूप मोठा धोका ठरणार आहे. करोनाबाधितांची संख्या मुळातच त्यांच्याकडे वाढत असतानाच सरकारने या जल्लोषावर कोणतेही बंधन घातलेले नव्हते.
#INDvsBAN | ‘सामनावीर’ कुलदीप यादवला संघातून बाहेर ठेवल्याने सुनील गावस्कर संतापले, म्हणाले…
त्यामुळे आता हा धोका किती वाढतो व त्याचा काय परिणाम होणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत अर्जेंटिनामध्ये जवळपास 98 लाख करोनाबाधित आढळले आहेत व त्यातील तब्बल 1 लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या सात दिवसांत ही रुग्णसंख्या तब्बल 60 हजारांनी वाढली आहे.
करोना संसर्गात प्रचंड वाढ
चीनमध्ये करोनाचा धोका प्रचंड वाढल्यावर जगभरातही त्यात वाढ झाल्याचे समोर येत आहे. चीन व अर्जेंटिनापाठोपाठ जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स, ब्राझील, अमेरिका, जर्मनी, हॉंगकॉंग व तैवानमध्येही ही रुग्णवाढ झपाट्याने होत आहे. भारतात अद्याप चिंतेचे चित्र नसले तरीही जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतासह सर्वच देशांना याबाबत धोरण निश्चित करण्यास सांगितले आहे.