दिल्ली – आयपीएस अधिकारी आणि तिहार तुरुंगाचे माजी महासंचालक संदीप गोयल यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संदीप यांची महिनाभरापूर्वीच बदली झाली होती.
दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानुसार, दिल्ली सरकारच्या गृह विभागाचे उपसचिव शैलेश कुमार यांनी हे आदेश जारी केले आहेत.
महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून साडेबारा कोटी घेतल्याचा गंभीर आरोप गोयल यांच्यावर झाला होता. गेल्या महिन्यात खुद्द सुकेशने हा आरोप केला होता. सुकेशच्या आरोपानंतर गोयल यांची इतरत्र बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता सेवेतून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
Delhi : संभाव्य कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज – केजरीवाल
दरम्यान, तिहार तुरुंगाचे माजी डीजी संदीप गोयल यांच्या कार्यकाळात तिहार तुरुंगात भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप झाले होते. संदीप गोयल यांच्यावरही हे आरोप करण्यात आले होते.