मुंबई – फिफा विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाने विजेतेपद पटकावले. यामध्ये अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. मेस्सीचा चाहतावर्ग जगभरात असून भारतातही त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा हेसुद्धा मेस्सीचे चाहते आहेत. नुकतंच मेस्सीने जय शहा यांना एक सरप्राइज दिले.
INDvsBAN | भारतीय संघ मारणार मिरपूरचे मैदान? विजयासाठी 100 धावांची गरज
याचा फोटो आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य आणि माजी खेळाडू प्रज्ञान ओझाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मेस्सीने जय शहा यांना अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली आहे. यावर मेस्सीने त्याची सहीसुद्धा केली आहे. जय शहा यांच्यासोबत या जर्सीचा फोटो पोस्ट करत प्रज्ञान ओझाने म्हटले की, GOATने जय भाई यांच्यासाठी आपल्या शुभेच्छा आणि सही असलेली जर्सी पाठवली आहे.
पाक क्रिकेटमध्ये चक्क सासरे-जावयाची जोडी; शाहीद आफ्रिदीची ‘या’ प्रमुख पदावर नियुक्ती
आशा आहे की मलासुद्धा माझ्यासाठी एक जर्सी मिळेल, अशी अपेक्षासुद्धा प्रज्ञान ओझाने व्यक्त केली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सला हरवून 36 वर्षांनी विजेतेपद पटकावले होते. अर्जेंटिनाच्या या विजयानंतर जय शहा यांनी अर्जेंटिनाच्या संघाचे अभिनंदन केले होते. जय शहा यांनी म्हटले होते की, फुटबॉल किती अविश्वसनीय खेळ आहे.