मुंबई – अरे आवो ना फिर… असं म्हणत सिनेमॅटोग्राफर, निर्माता, दिग्दर्शक, रिऍलिटी शोज चे परीक्षक, अभिनेता या सर्व भूमिका यशस्वीपणे पार पाडणारे मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू व्यक्तिमत्व ‘संजय जाधव’ यांचा 18 जुलै म्हणजेच, आज वाढदिवस आहे.
संजय जाधव यांनी दुनियादारी, मितवा, प्यारवाली लव्हस्टोरी, खारी-बिस्कीट आणि गुरू यासारखे दमदार सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे त्यांनी मराठी सिनेरसिकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. दरम्यान, आपल्या वाढदिवसाच्याऔचित्याने संजय जाधव यांनी आपल्या चाहत्यांना अनोखे गिफ्ट दिले आहे.
लवकरच ‘वेल डन बेबी’ चित्रपटातुन एका विशेष लक्षवेधी भूमिकेत संजय जाधव आपल्या भेटीला येणार आहेत. मराठी अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ हिने या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिने आपल्या अधीकृत इंस्टाग्राम अकाउंटवर या संदर्भात एक पोस्ट देखील शेअर केली आहे.