स्थायीत सुमारे 28 कोटींच्या विकासकामांना मंजुरी 

पिंपरी  – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी वाघेरे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर आसनस्थ पुतळा बसविण्यात येणार आहे. तसेच त्या परिसराच्या विकासासाठी येणाऱ्या सुमारे 74 लाख 89 हजार रुपये खर्चासह शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 27 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात बुधवारी (दि.24) झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते.

प्रभाग क्र. 11 मधील पूर्णानगर येथील से.क्र. 18 सीडीसीमधील मोकळी जागा क्र.4 पर्यटन केंद्राच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी सुमारे 14 कोटी 96 लाख 80 हजार रूपये खर्चास यावेळी मंजुरी देण्यात आली. पवना धरणातून बंद पाईप लाईनमधून पाणी आणण्याचे पाईप स्थलांतर करण्यासाठी 80 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

याशिवाय प्रभाग क्र.49 थेरगाव बापुजीबुवा नगर येथील सर्व्हे नं.9 मध्ये 200 बेड क्षमतेच्या दवाखाना इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीत उच्चदाब वीज पुरवठा करण्यासाठी सुमारे 84 लाख 64 हजार रूपये खर्च, प्रभाग क्र.2 चिखली मधील से.नं. 16 राजेशिवाजी नगरमध्ये पदपथ विकसित करण्यासाठी सुमारे 1 कोटी 12 लाख 53 हजार रूपये खर्च, प्रभाग क्र.6 धाडेवस्ती, भगतवस्ती, गुळवेवस्ती परिसरामध्ये स्टॉर्म वॉटर लाईनकरिता सुमारे 62 लाख 55 हजार रूपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सायन्स पार्क तारांगणच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी 2 कोटी 27 लाख 42 हजार रूपये, बोऱ्हाडेवाडी, खिरीडवस्ती, आहेरवाडी, आल्हाटवस्ती, विनायकनगर येथील रस्ते डांबरीकरणासाठी 88 लाख 30 हजार रूपये खर्चास मान्यता देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.