अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्‍तेपदी सुप्रिया श्रीनेट यांची नियुक्‍ती

नवी दिल्ली : कॉंग्रेसने सुप्रिया श्रीनेट यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. कॉंग्रेसमध्ये जाण्यापूर्वी सुप्रिया यांनी एका इंग्रजी टीव्ही चॅनेलमध्ये ज्येष्ठ संपादक म्हणून काम पाहिले. त्यांना पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जागेवरुन तिकीट दिले होते. त्यांचे वडील दिवंगत हर्षवर्धन सिंह हे कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आणि खासदारही राहिले आहेत.

सुप्रिया सिंह श्रीनेट यांचा जन्म फेब्रुवारी 1977 मध्ये झाला होता. त्यांनी आपले शालेय शिक्षण लोरेटो कॉन्व्हेंट लखनऊ येथून पुर्ण केले आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. पॉलिटिकल सायन्समध्ये एमए केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका टीव्ही चॅनेलद्वारे केली. गेल्या 10 वर्षांपासून त्या एका टीव्ही चॅनेलमध्ये कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाने उत्तरप्रदेशच्या महाराजागंज जागेवरुन तिकिट दिले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.