मेष : मानले तर समाधान मिळेल. व्यवसायात केलेल्या कामाचे पैसे हातात मिळण्यास विलंब होईल तरी सबुरीचे धोरण ठेवा. वसुली करताना जिभेवर साखर पेरून बोला. वागण्या-बोलण्याने हितसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नका. वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. पैशाच्या व्यवहारात चोख राहा. घरात किरकोळ कारणावरून वादाचे प्रसंग होतील, तेव्हा डोके शांत ठेवावे.
वृषभ : कार्यक्षेत्र विस्तृत करण्यासाठी विशेष प्रयत्न राहील त्यात यशही येईल. व्यवसायात नवीन जबाबदारी समर्थपणे स्वीकाराल. काही महत्त्वाचे निर्णय आवश्यक तेथे घ्याल. पैशाची तजवीज होईल. नोकरीत कामाचा वेग वाढेल. सरकारी नियमांमुळे ध्येयधोरणे बदलाल. अतिविश्वास कोणावरही ठेवू नका. घरात कामाचा ताण वाढेल. खर्चाचे बजेट कोलमडेल. कौटुंबिक सोहळ्यात वेळ मजेत जाईल. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.
मिथुन : मनाला जे पटेल, रुचेल असेच वागा, म्हणजे साशंकता निर्माण होणार नाही. व्यवसायात भावनेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य राहील. नवीन करार करताना त्यात अटी नियमांचा बारकाईने अभ्यास करा मगच सह्या करा. विक्षिप्तपणा हितसंबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नोकरीत गुप्तता राखा. सहकाऱ्यांशी बोलताना तोलून मापून बोला. होणारे गैरसमज टाळा. घरात कौटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागेल.
कर्क : जमाखर्च समसमान राहील त्यामुळे हाती शिल्लक राहणार नाही. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कार्यपद्धतीत बदल कराल. नोकरीत महत्त्वाच्या कामासाठी तुमची निवड करतील त्यासाठी जादा अधिकारही देतील. मात्र, गैरफायदा घेऊ नका. कामाचा ताण वाढेल तेव्हा सहकाऱ्यांकडून काही कामे करून घ्याल. कामाचे वेळी काम इतर वेळी आराम असे धोरण राहील.
सिंह : तंत्र सांभाळून कामे करा. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तीकडून नवीन अनुभव येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात दक्ष रहा. हातून काहीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्या. कामाच्या नवीन संधी दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागणे हितकारक ठरेल. सत्तेपुढे शहाणपण नाही हे लक्षात ठेवावे. घरात कामाबाबत कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नका. कामाचे योग्य नियोजन करून कामे वेळेत संपवावीत.
कन्या : स्वभावाला औषधं नाही हे लक्षात ठेवून इतरांशी संबंध ठेवावेत. व्यवसायात स्वप्नपूर्तीसाठी जीवाचे रान करू नका. कामाची योग्य आखणी करून प्रगती साधा. हितचिंतक व निष्णात व्यक्तींचा सल्ला आवश्यक तेथे घ्या. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचेकडून बरीच अपेक्षा राहील. जोडधंद्यातून आर्थिक प्राप्ती होईल. कामानिमित्ताने प्रवासयोग बदल किंवा बदलीसाठी सरकारी नोकरीत विशेष प्रयत्न करावेत.
तुळ : “अति तेथे माती’ ही म्हण लक्षात ठेवा. व्यवसायात मतलब साध्य करून घेण्यासाठी तडजोडीचे धोरण स्वीकारा. जुनी येणी लांबल्याने तुमची आर्थिक कुचंबना होईल. नवीन कामे दृष्टिक्षेपात असतील. मात्र, संभाव्य धोक्यांचा विचार करून पुढे जा. नोकरीत कार्यतत्पर राहा. वरिष्ठांचा मूड बघून मागण्या मान्य करून घ्या. कोणतीही उधार उसनवार करू नका. आर्थिक व्यवहारात काटेकोर राहा. पैशाचा अतिमोह टाळा. मन:स्वास्थ्य सांभाळा.
वृश्चिक : आशा-निराशेचा खेळ दाखवणारे ग्रहमान आहे. व्यवसायात, कामात अनपेक्षित अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्चही वाढेल. मात्र, तुमचे मनोधैर्य उत्तम असल्याने यशस्वीपणे मात कराल. कामांना विलंब झाला तरी अहोरात्र काम करून वेळेत कामे पूर्ण करू, असा विश्वास वाटेल. सरकारी नियमांचे मात्र काटेकोरपणे पालन करा. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे तंत्र सांभाळून कामे उरका. महत्त्वाचे निर्णय तूर्तास पुढे ढकला.
धनु : या सप्ताहात एखादी चांगली गोष्ट मनात आली तर लगेच कृतीत आणा. सभोवतालच्या व्यक्तींशी सलोख्याचे संबंध ठेवलेत तर केलेल्या कामाचे समाधान मिळेल. व्यवसायात नवीन मैत्री व कराराचे प्रस्ताव समोर येतील. परंतु तुर्तास सह्या करण्याची घाई नको. पैशाची सोय हितचिंतकांकडून होईल. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे कराल. वरिष्ठांच्या शब्दाला मान द्याल. जोडधंद्यातून विशेष लाभ होईल. घरात आचरण व विचार यांचा ताळमेळ घालून कमी बोला.
मकर : सतत कार्यमग्न राहून प्रगती करण्यावर भर राहील. व्यवसायात विनाकारण होणारा विलंब सहन होणार नाही त्यामुळे बेधडकपणे निर्णय घेण्याकडे कल राहील. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत तुमच्या शब्दाला मान मिळेल. सहकारी व वरिष्ठ यांची मदत कामी येईल. मात्र मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर करू नका. मौनव्रत पाळा. घरात प्रकृतीचे तंत्र सांभाळून काम करणे हितावह ठरेल. मनाप्रमाणे काम करता आल्याने समाधान मिळेल. सकारात्मक दृष्टिकोन यश देईल
कुंभ :“केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, हे लक्षात ठेवून कामाला लागा. व्यवसायात सभोवतालच्या व्यक्तींबरोबर तुमचे संबंध कसे ठेवता यावर यश अवलंबून राहील. नवीन अनुभव येतील. नवीन कामे व योजना हाती घ्याल. त्याला पैशाची उभारणी बॅंका व ओळखीतून होईल. नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागेल, तरी चिडू नका. कार्यतत्पर राहा. वरिष्ठांचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्या. घरात स्वयंसिद्ध राहा. नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.
मीन : ग्रहांची साथं राहील. त्यामुळे उत्साही राहाल. व्यवसायात कामाचे योग्य नियोजन कमी श्रमात जास्त यश देईल. महत्त्वाची कामे स्वत: करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घेतलीत, तर त्याचा लाभ अधिक होईल. नोकरीत तुमचे विचार वरिष्ठांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामामुळे तुमचे महत्त्व वाढेल. सहकारी कामात मदत करतील. घरात सर्वांना सांभाळून घेणे ही तारेवरची कसरत असेल. शब्द हे एक हत्यार आहे म्हणून ते जपून वापरा. मनन, चिंतनात मन गुंतवा.