मुंबई- अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील भुमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिच्या शेवंता नावाच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली. या भूमिकेसाठी तिने स्वत:चं वजनसुद्धा वाढवलं होतं.
View this post on Instagram
Coming soon ! . . #apurvanemlekar #cpl #coronapremierleague #lokshahinews
आता ती मालिका संपली त्यानंतर ती नव्या भूमिकेत सगळ्यांपुढे येणार आहे. ‘झी युवा’वरील आगामी मालिका ‘तुझं माझं जमतंय’मधून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अपूर्वा पम्मी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी या भूमिकेतून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लीन बोल्ड करण्यासाठी सज्ज झाली आहे.
या मालिकेचा जॉनर विनोदी असून पम्मी ही या मालिकेला ग्लॅमरचा तडका देणार आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिचे चाहते तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.