Rakesh Bapat: हिंदी मालिकांमध्ये झळकलेला अभिनेता राकेश बापट लवकरच आता मराठी मालिकेत दिसणार आहे. राकेश बापट मराठी मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. याचा दमदार प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. सध्या या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळत असून राकेशला या मराठमोळ्या या नव्या मालिकेत पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक झाले आहेत.
राकेश बापट ‘झी मराठी’च्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. अभिराम जहागीरदार अर्थात एजे या भूमिकेत राकेश झळकणार आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये, नजरेत धार, शिस्तबद्ध आणि रुबाबदार अशा अभिराम जहागीरदारची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे. पण आता या हिटलर अभिरामची होणारी नेमकी नवरी कोण असणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, यापूर्वी राकेश बिग बॉस ओटीटीमध्येही झळकला आहे. यात त्याचं शमिता शेट्टीसोबतचं अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. याशिवाय राकेशने ‘तू आशिकी’, ‘बात हमारी पक्की है’, ‘कुबूल है’, ‘नच बलिए ६’ अशा अनेक हिंदी मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. तसेच ‘वो तुम बिन’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘कुछ दिल ने कहा’, ‘कोई मेरे दिल में है’ यांसारख्या चित्रपटात तो झळकला आहे.
राकेश खुर्ची आणि वृंदावन या सिनेमातही झळकला होता. मात्र आता पुन्हा एकदा तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. परंतु त्याची नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते का? हे पाहावे लागणार आहे.