मुलांमध्ये राक्षसीवृत्ती का वाढतेय? हाथरस प्रकरणावर तनुश्री संतापली

मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा( बुधवारी दि . 30 सप्टेंबर ) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाच्या वेदनादायी आठवणी ताज्या झाल्या.

सध्या उत्तर प्रदेशातील या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत असून, अनेकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देखील देण्याचा प्रयत्न केला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हाथरसमधील घटनेवर राग व्यक्त केला आहे. याच पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री ‘तनुश्री दत्ता’ने करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे. देशातील तरुण मुलं हैवानाचं रुप घेत असल्याचं तिने म्हंटलं आहे.

तनुश्री म्हणाली कि, “हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून यामागील मूळ कारण आपण शोधायला हवं. देशातील तरुण वर्ग आणि मुलांमध्ये राक्षसीवृत्ती का वाढतेय याबाबत आपण विचार करायला हवा. बलात्काराच्या घटनांसाठी एक समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. असं ती म्हणाली.

तनुश्री पुढे म्हणाली, इतक्या गंभीर प्रकरणाचा काही जणं त्यांच्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी आणि राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. यापूर्वी सुद्धा अनेक सेलिब्रिटींनी हाथरसमधील घटनेवर राग व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.