पुणे – हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सातव्या अपोलो हॉटफुट करंडक युवा साखळी फुटबॉल स्पर्धेच्या ११ वर्षाखालील गटामध्ये स्टेपओव्हर फुटबॉल अकादमी, लौकिक फुटबॉल अकादमी, उत्कर्ष क्रिडा मंच, मॅथ्यु फुटबॉल अकादमी, फाल्कन्स् फुटबॉल अकादमी आणि स्पोर्ट्स मेनिया या संघांनी आगेकूच केली.
९ वर्षाखालील गटाच्या सामन्यात इशान जोशी याच्या कामगिरीच्या जोरावर स्टेपओव्हर फुटबॉल अकादमीने स्पोर्ट्स मेनिया संघाचा १-० असा पराभव केला. लौकिक फुटबॉल अकादमी अ संघ आणि साई फुटबॉल अकादमी यांच्यातील सामना २-२ असा बरोबरीत सुटला. लौकिक संघाकडून अंकित मोरे आणि अमेय धर्माधिकारी यांनी तर, साई फुटबॉल अकादमीकडून रेयांश सिंग याने दोन गोल नोंदविले.
कुशल मोरे आणि अहान शहा यांच्या गोलपूर्ण कामगिरीच्या जोरावर उत्कर्ष क्रिडा मंच अ संघाने फोर लायन्स् फुटबॉल अकादमी अ संघाचा २-० असा सहज पराभव केला. मोहम्मद शेख आणि अविनाश जोशी यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर फाल्कन्स् फुटबॉल अकादमीने मॅथ्यु फुटबॉल अकादमी अ संघाचा २-० असा सहज पराभव केला. मॅथ्यु फुटबॉल अकादमी ब संघाने पुणे सॉकर क्लबचा १८-० असा धुव्वा उडविला.
IND vs ENG : आर. अश्विनने रचला इतिहास, ‘विशाखापट्टणम’मध्ये मोडला 45 वर्षे जुना विक्रम…
विजयी संघाकडून शौर्य रणदिवे, हर्ष केळकर आणि अर्णव गुंजाळ यांनी प्रत्येकी पाच गोलांची बरसात केली. मल्हार देशपांडे याने दोन गोल तर, सुहान गोखले याने एक गोल केला. दुसर्या सामन्यातही मॅथ्यु फुटबॉल अकादमी ब संघाने साई फुटबॉल अकादमीचा ६-० असा सहज पराभव केला. उत्कर्ष क्रिडा मंच अ संघाने स्टेपओव्हर फुटबॉल अकादमीचा ४-१ असा पराभव केला. स्पोर्ट्स मेनिया संघाने लौकिक फुटबॉल अकादमी अ संघाचा ५-१ असा सहज पराभव केला.