बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र अनुष्का आणि विराटने अद्याप आजवर याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
अशात आता अभिनेत्रीने अनुष्काने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा अफवांचा रंगल्या आहे. अनुष्का शर्माने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गर्भधारणा चाचणी किटची जाहिरात शेअर केलीये. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत अनुष्का आणि विराटचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. अनुष्का हावभावातून तिच्या प्रेग्नेंसीकडे इशारा करत आहे का, असा अंदाज युजर्सकडून लावला जात आहे.
कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘आम्हाला तुमचे हावभाव समजले आहेत.’ दुसऱ्या यूजरने लिहिले, ‘याचा अर्थ तुम्ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहात.’ असं म्हणत सोशल मीडियावर चाहते तिला प्रश्न विचारत आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेत्री मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर स्पॉट झाली होती. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती पती विराट कोहलीसोबत पोज देताना दिसली. त्याच फोटोत ती तिच्या बेबी बंपला स्पर्श करताना दिसत आहे. मात्र, नंतर हा फोटो एडिट करून दिवाळीच्या वेळी क्लिक केल्याचे आढळून आले. अनुष्का आणि विराटने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीच्या टस्कनी येथे लग्न केले आणि 2021 मध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे वामिकाचे स्वागत केले.