Chhavi Mittal : टीव्ही अभिनेत्री छवी मित्तलने (Chhavi Mittal) अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. मालिकेच्या सेटवर तिच्यासोबत दुर्घटना घडल्याचे दिसते. तिच्यासोबत घडलेला भयानक किस्सा तिने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
छवी मित्तलने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिच्या केसाला अचानक आग लागल्याचे दिसते. यात ती म्हणते की, जळण्याचा वास येत आहे. आग तर लागली नाही ना? तर तिच्यासोबत असलेल्या अभिनेत्याने सांगितले की, हो तुझे केस जळाले आहेत. छवीला हे ऐकून मोठा धक्का बसतो. छवीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सेटवर अपघात होतात, पण माझ्या केसांना आग लागणे सर्वात भयंकर होते. आधी आम्हाला सगळ्यांना काहीतरी जळत असल्याचा वास आला. मग माझ्या पाठीमागे एक मेणबत्ती असल्याचं लक्षात आले. मी थोडे पुढे गेले पण तोपर्यंत आग लागली होती आणि माझे केस जळाले होते. स्वतःच्या हातांनी ही आग विझवल्याबद्दल आणि मला वाचवल्याबद्दल करण वीर ग्रोव्हर तुझं खूप आभार.’ हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते देखील चिंतेत आले आहेत.
छवी मित्तल शूटिंगसाठी सेटवर गेली होती. यावेळी ती तिच्या पतीसोबत बोलत होती आणि अचानक तिच्या केसांना आग लागली. यावेळी अभिनेता करण वीर ग्रोवरही तिथे उपस्थित होता. त्याने तातडीने छवीच्या केसाला लागलेली आग हाताने विझवल्याने मोठा अनर्थ टळला.