Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे बॉलीवूडची पंगाक्वीन म्हणूनही तिला ओळखले जाते. विविध विषयांवर सोशल मीडियावर कंगना भाष्य करताना दिसते. याशिवाय कंगणा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील झाल्या होत्या. यातच आता कंगणाचे वडिल अमरदीप राणावत यांनी एक विधान केल्याने आता पुन्हा एकदा कंगणा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यामुळे आता कंगना 2024 मध्ये भाजपकडून लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. अमरदीप राणावत यांनी एका मुलाखतीत कंगणा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले आहे. अमरदीप राणावत म्हणाले की, “भाजपने कंगनाला निवडणुकीचं तिकीट दिल्यास ती निवडणूक लढवण्यास तयार आहे. मात्र कंगना कोणत्या भागातून निवडणूक लढवणार याचा निर्णय पार्टी घेईल. कंगनाची कुल्लू येथील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा सुरू आहे.”
काही दिवसांपूर्वीच कंगनाने राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. “कलाकार असल्यामुळे राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल मी खूप इच्छुक आहे. पण सध्या तरी मी राजकारणात एन्ट्री करणार नाही. ” त्यानंतर रविवारी 17 डिसेंबर रोजी कंगणाने कुल्लू येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. काही महिन्यांत कंगनाची जेपी नड्डासोबत तिसरी भेट आहे. अशातच कंगनाच्या वडिलांच्या विधानाने ती निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कंगना निवडणुक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.