नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपाचे खासदार पर्वेश वर्मा यांना दिल्लीत प्रचार करण्यापासून अनुक्रमे 72 आणि 96 तासांसाठी बंदी घालण्यात आली. प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल निवडणूक आयोगाने हे आदेश दिले.
दिल्लीतील स्टार प्रचारकांच्या यादीतून ठाकूर आणि वर्मा यांची नावे वगळण्याचा आदेश दिल्याच्या दुसऱ्या दिवशी ही कारवाई करण्यात आली. या दोन नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांबद्दल दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी अहवाल दिला आहे.
केंदीय अर्थ राज्यमंत्री असणाऱ्या ठाकूर यांनी निदर्शकांना गोळ्या घालायला हव्यात, असे आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर भाषण केले होते. तर वर्मा यांनी शाहीन बागेतील निदर्शक घरात घुसून बलात्कार करतील असे विधान आपल्या प्रचार सभेत केले होते. त्यामुळे त्यांच्यावे कारवाईची मागण निवडणूक आयोगाने केली होती.