#ILeague Football : मिनर्वा पंजाबचा नेरोकावर ३-२ ने विजय

नवी दिल्ली : दिपांदा डिका याच्या हॅटट्रिकच्या जोरावर मिनर्वा पंजाब एफसी संघाने आयलीग फुटबाॅल सामन्यात नेरोका एफसी संघाचा ३-२ ने पराभव करत विजय नोंदविला.

नेरोका एफसी संघाकडून वरूण थोकचोम याने ४ थ्या आणि फिलिज टेटेहने २० व्या मिनिटाला गोल करत २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. पण, मिनर्वा पंजाबकडून डिकाने २७ व्या मिनिटाला पहिला, ४३ व्या मिनिटाला दुसरा आणि ८९ व्या मिनिटाला तिसरा गोल करत संघास ३-२ ने विजय मिळवून दिला.

या विजयासह मिनर्वा पंजाबचा संघ १० सामन्यातील १७ गुणांसह गुणतालिकेत दुस-या स्थानी पोहचला आहे तर मोहन बागानचा संघ २० गुणांसह अव्वलस्थानी आहे. नेरोका एफसीचा संघ ९ सामन्यातील ८ गुणांसह गुणतालिकेत ८ व्या स्थानी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.