VIDEO|अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद

बिबट्या (मादी) पिंजऱ्यापासून पळाल्याने दहशत कायम 

बारामती: बारामती तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत बिबट्याने जनावरे ठार केली होती त्यामुळे बारामती तालुक्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली होती. बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याला पकडण्यासाठी संतोष जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये वन विभागाने पिंजरा लावला होता अखेर हा बिबट्या पहाटेच्या सुमारास लावलेल्या पिंजऱ्यात (नर) बिबट्या जेरबंद झाला. मात्र (मादी) बिबट्या पळाल्याने अजूनही भीतीचे वातावरण आहे.

गेल्या आठ दिवसापासून काटेवाडी आणि कन्हेरी परिसरात सहा ट्रॅप कॅमेरे आणि तीन पिंजरे लावले होते त्यानुसार आज पहाटे कण्हेरी भागातील संतोष जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजऱ्यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाल्याचे रेस्क्यू टीमचे अभिजित महाले, बारामतीचे वनपाल अधिकारी त्रिंबक जराड यांनी सांगितले.

गेले दोन महिने सातत्याने बिबट्या शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला करत होता. बिबट्या हा सातत्याने उसाच्या शेतामध्ये लपून बसत होता त्यामुळे ऊसतोड मजूर देखील ऊस तोडण्यास धजावत नव्हते. आज अखेर पहाटे जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद झाला. यामुळे वनविभाग आणि रेस्क्यू टीमचे अभिनंदन करतो त्यांनी अथक परिश्रम घेऊन या बिबट्याला जेरबंद केले असल्याचे ग्रामस्थ सुधीर पानसरे यांनी सांगितले.

तालुक्यात अनेक दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता गेल्या आठ दिवसापासून वन विभाग आणि पुण्याच्या रेस्क्यू टीमने ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरे लावून त्यावर लक्ष केंद्रित केले होते आज पहाटे लावलेल्या पिंजर्‍यात नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला असला तरीदेखील (मादी) बिबट्या मात्र पिंजऱ्यापासून पळाला आहे यामुळे या भागातील बिबट्याची दहशत कायम आहे. यामुळे ग्रामस्थांनी सावधान राहणे गरजेचे आहे..

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.