श्रीनगर – काश्मिरातील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आज आणखी एक दहशतवादी ठार झाला. त्याच्या संबंधात गुप्तचर सूत्रांकडून माहिती मिळाली होती. तो ज्या ठिकाणी लपला होता त्या परिसराला वेढा घालून सुरक्षा जवानांनी ही कारवाई केली. तो ठार झाल्यानंतर त्या परिसरातील प्रत्येक घराची जवानांनी झाडाझडती घेऊन तपास केला. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अजून पटलेली नाही.
गेले काही दिवस सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन त्यांना टिपण्याची मोहीमच हाती घेतल्यमुळे दहशतवादी संघटनांचे कंबरडे मोडले आहे. काश्मीरच्या अंतर्गत ग्रामीण भागात सुरक्षा यंत्रणांनी आपले गुप्तचरांचे जाळे अधिक व्यापक केल्याने त्यांना या मोहीमांमध्ये मोठे यश प्राप्त होत आहे.