जमैका – इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने संघ जाहीर केला आहे. करोनाचा धोका असल्याने सुरुवातीला या मालिकेत सहभागी होण्यास नकार देणाऱ्या शॅनन गॅब्रियल यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. 14 खेळाडू व 10 राखीव खेळाडू असा संघ इंग्लंडमध्ये आधीच दाखल झाला होता. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता याच खेळाडूंमधून 14 खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे.
वेस्ट इंडिज संघ –जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कॅम्पबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शॅनन गॅब्रियल.