आर. माधवन आणि विजय सेतुपती यांच्या तमिळमधील गाजलेल्या “विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान हे दोघेजण लीड रोलमध्ये दिसणार आहेत. सिनेमाच्या सेटचे साहित्य मुंबईमध्ये फिल्मसिटीमध्ये येऊन दाखल झाले होते.
सेट करण्यासाठी कारागिरांनाही पाचारण केले गेले होते. पण तेवढ्यात लॉकडाऊन लागला होता. लॉकडाऊनमुळे थांबलेले शुटिंग आता पुन्हा सुरू होते आहे. आता काही सिनेमांचे शुटिंग पुन्हा सुरू होते आहे. पण डेल्टा व्हेरिएंटच्या धास्तीमुळे मुंबईतील शुटिंग अजून सुरू झालेले नाही. महागडा सेट करायला वेळ लागणार आहे.
पण कामाची सुरुवात केल्यानंतर ते थांबवणे शक्य नाही. मात्र सुरक्षितता पाळण्यासाठी थोडा काळ आणखीन वाट बघायला लागली तरी चालेल, असा विचार निर्मात्यांनी केला आणि सेट कारण्याचे काम काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या तरी हे सेट करण्याचे काम सुरू होणार नाही, असे “फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ंने सांगितले आहे. “विक्रम वेधा’च्या रिमेकमध्ये आगोदर आमिर खानने काम करण्याचे मान्य केले होते. मात्र नंतर थोड्याच दिवसात त्याने हा सिनेमा सोडला आणि त्याच्या जागेवर हृतिक रोशनची वर्णी लागली आहे. त्याच्या बरोबर सैफ अली खानही असणार आहे.