मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नावाने असलेले एक फेसबुक अकाऊंट हॅक झाले आहे. अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्या अकाउंट वरून कोणी तरी त्यांच्या नावाने पैशाची मागणी करत आहे. याबाबत बाळा नांदगावकर यांनी स्वत: माहिती दिली आहे.
https://www.facebook.com/MeBalaNandgaonkar/posts/4058223337566317
बाळा नांदगावकर यांनी एक पोस्ट करून माहिती दिली, ”मित्रानो आजकालच्या या टेकॅनॉलॉजि च्या युगात आपण खुप सावध असले पाहिजे, नुकतेच माझ्या नावाने विविध फेसबुक अकाउंट वर काही भामटयानी अनेकांना मेसेज करून पैसे मागितले. या बद्दल मी रीतसर तक्रार नोंदविली आहे पण कोणीही असो पैसे मागितल्यावर, कधीही कोणाच्याही नावाने मागितले तरी त्याला खात्री केल्याशिवाय अजिबात 1 दमडीही देऊ नये. ज्या 2 नंबर वरून ते मागितले गेले ते खालीलप्रमाणे. 7376801541, 8607892210 सामान्य जनतेचे आपल्या नेत्यांवर प्रेम असते व या प्रेमापोटी तो कधी कधी अशा लबाडीला बळी पडू शकतो. परंतु आपणास विनंती आहे की आत्ताच नाही तर इथून पुढेही कधी असा प्रकार झाल्यास अशा मागणी करणाऱ्यास 1 रुपया हि आपण देऊ नये. आपली माझ्यावरील प्रेमा पोटी फसवणूक होऊ नये म्हणून आपणास या पोस्ट द्वारे ह्या सगळ्या बाबतीत सूचित करीत आहे.”
नांदगावकर यांनी माहिती देताना Blue Tick वाले हे अकाउंटच अधिकृत आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्यामुळे अन्य् दुसऱ्या अकाऊंटवरुन कोणत्याही प्रकारची मागणी केल्यास त्यास बळी न पडण्याचे त्यांनी सांगितले.