बारामती – मुर्टी (ता. बारामती) येथील करोना संक्रमित रुग्णाचा मुलगा करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्याच्यावर बारामती येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वरील मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बारामतीतील हा 13 वा करोनाचा रुग्ण ठरला आहे.
करोनाबाधित रुग्ण मुंबई येथून मुर्टी येथे आपल्या राहत्या घरी आला होता. तो करोना संक्रमित आढळल्याने त्याच्या संपर्कातील नऊ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी त्याच्या मुलाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला तरी इतर आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.