Imran Khan – इम्रान खान आणि त्यांचे सहकारी फवाद चैधरी यांच्याविरोधात पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने बदनामीचा आणखीन एक खटला दाखल केला आहे.
पाकिस्तानचा निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान राजा यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याबद्दल या दोन्ही नेत्यांवर २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज या दोन्ही नेत्यांना कोर्टात हजर करण्यात आले आणि त्यांना त्यांच्यावरील आरोप वाचून दाखवण्यात आले. या दोन्ही नेत्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
या प्रकरणाच्या सुनावणीला यापूर्वी वारंवार स्थगित करण्यात आले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव इम्रान खान यांना पोलिसांनी न्यायालयात हजर करण्यास टाळाटाळ केली होती.
यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची सुनावणी अदियाला तुरुंगातच घेण्याचा आग्रह ६ डिसेंबर रोजी धरला होता. त्यानुसार या दोघांवर आरोप ठेवण्यात आले आहेत.