सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिराच्या अहवालानुसार 168 आणि खासगी प्रयोगशाळेतील अहवालानुसार 15 अशा 173 जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने रविवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 4266 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दोन करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, 168 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहे. तर खटाव व वाई तालुक्यातील प्रत्येकी 1 अशा एकूण 2 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
खासगी प्रयोगशाळेतील अहवालात 15 रुग्ण करोनाबाधित
27 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 15 रुग्णांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते करोनाबाधित असल्याचे कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
दोन बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कवठे (ता. वाई) येथील 70 वर्षीय पुरुष या दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.