वडगाव मावळ – मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायती हद्दीत दिवसेंदिवस करोना रुग्ण वाढत आहेत. त्या रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी येथील मुस्लीम बांधवांनी बकरी ईदच्या निमिताने जामा मस्जिदीची जागा क्वारंटाइन सेंटरसाठी उपलब्ध करून दिली आहे.
मस्जिदीची जागा क्वारंटाइन सेंटरला देण्याचे लेखी निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके यांना शनिवारी (दि. 1) देण्यात आले. वडगाव येथील जामा मस्जिद मुस्लीम बांधवांनी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून बकरी ईदच्या निमिताने मस्जिदची जागा उपलब्ध करून दिली, असे लेखी निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके व वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांना देण्यात आले.
यावेळी हाजी इब्राहिम शेख, रसीद शेख, मौलाना मुजीब शेख, अफताब सय्यद, युनुस मोमीन, सलीम तांबोळी, अब्दुल शेख व मुस्लिम बांधव उपस्थित होते.