पुणे – जम्बो कोविड सेंटरमध्ये लवकरच व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजनचे 160 बेड्स उपलब्ध होणार आहेत. तसेच ही सगळी तयारी करून गुरूवारपासून याठिकाणी रुग्णांना दाखल करून घेण्यात येणार आहे.
यामध्ये 100 ऑक्सिजन बेड आणि 60 आयसीयू बेड यांचा समावेश आहे. तसेच त्यात 30 व्हेन्टिलेटर बेड्स असतील.
सध्या रुग्णालयात 178 रुग्ण दाखल आहेत. यातील 38 रुग्ण आयसीयूमध्ये तर 11 रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. महापालिकेने येथे 59 डॉक्टर्स आणि 140 पॅरामेडिकल स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय आणखी मनुष्यबळही येथे नियुक्त केले जाणार आहे. याविषयीचे विस्तृत माहिती रविवारपर्यंत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या रुग्णालयात दोन कोटी रुपयांची औषधांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. याशिवाय आजपर्यंत 17 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे.