पुण्यात ऍम्ब्युलन्स वेळेत मिळण्यासाठी पालिका राबवणार ‘हा’ उपक्रम

पुणे – शहरात 155 ऍम्ब्युलन्स असतानाही एकही वेळेवर पोहोचत नाही, या तक्रारी वाढल्या आहेत. बेड्च्या उपलब्धतेसाठी जसा “डॅशबोर्ड’ आहे तसाच “डॅशबोर्ड’ ऍम्ब्युलन्स सेवेसाठी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

करोनाने मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याच्या कारणावरून मनसेचे महापालिकेतील गटनेते वसंत मोरे यांनी सहायक आयुक्तांची मोटार फोडल्याचा प्रकार सोमवारी घडली. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी ऍम्ब्युलन्सच्याच व्यवस्थेचा आढावा घेणे गरजेचे होते. त्यानुसार नव्याने नियुक्त करण्यात आलेले महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी आढावा घेतला.

155 ऍम्ब्युलन्सपैकी 60 ऍम्ब्युलन्स मोबाइल आहेत. काही ऍम्ब्युलन्स रुग्णालयांच्या बाहेर राखीव ठेवल्या आहेत. मुळात एवढ्या ऍम्ब्युलन्स उपलब्ध असताना वेळेची दिरंगाई होता कामा नये, असे वाटते. त्यामुळेच त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे डॉ. खेमनार म्हणाले.

घरामध्ये किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये करोना बाधिताचा मृत्यु झाल्यानंतर 20 तास उलटूनही ऍम्ब्युलन्स मिळत नसल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत शहरात घडले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.