सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १४ जणांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १०४५ झाली आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असलेल्या १४ नागरिकांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) येथील १८ वर्षीय युवक, ४५ व २० वर्षीय महिला, ४२ वर्षीय पुरुष, कुसरुंड येथील ४० वर्षीय पुरुष, चोपडी येथील ६० वर्षीय महिला, कराड येथील गजानन हौसिंग सोसायटी येथील ४० वर्षीय पुरुष, चरेगाव येथील ३२ वर्षीय पुरुष , शिवडे येथील ३६ वर्षीय पुरुष, तारुख येथील ७० वर्षीय पुरुष, कोयना वसाहत येथील १० वर्षाचा मुलगा, विद्यानगर, सैदापूर येथील २६ वर्षीय महिला, मलकापूर येथील २६ वर्षीय पुरुष, नडशी येथील ३१ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
145 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह पुण्याच्या एन.सी.सी.एस. व कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १४५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
तसेच २७ जून रोजी एन.सी.सी.एस. यांनी कळविलेल्या रिपोर्टमधील ५५ वर्षीय पुरुष हा गोडोली येथील असल्याचे कळविले होते. परंतु त्याचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे (ता. मावळ) असल्याने या बाधिताची नोंद जिल्ह्यातून वगळण्यात आली आहे, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.