सातारा – जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 13) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 134 नागरिक करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये दोन करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी शनिवारी दिली. गेल्या आठवडाभरात मृतांची संख्याही थोडी कमी झाल्याने प्रशासनाला थोडासा दिलासा मिळाला आहे.
सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात गोडोली, शाहूनगर प्रत्येकी दोन, सोमवार पेठ, सदरबझार, यादोगोपाळ पेठ प्रत्येकी एक, इतरत्र सहा, शिंदेघर नऊ, कोडोली दोन, दौलतनगर, आंबेदरे, वर्णे, विलासपूर, धनगरवाडी, कारंडवाडी प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये मलकापूर पाच, कराड शहर, सुपने प्रत्येकी दोन, पाली, सुलेवाडी, कुसूर प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण दोन, लोरेवाडी, आंबेवाडी, सुलेवाडी, गलमेवाडी, बनपुरी प्रत्येकी एक, फलटण तालुक्यात हिंगणगाव तीन, सुरवडी, वाघोशी, साखरवाडी प्रत्येकी दोन, आसू, दुधेबावी, विद्यानगर
वाघोशी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज नऊ, पुसेगाव तीन, निढळ दोन, विखळे, बुध प्रत्येकी एक, माण तालुक्यात गोंदवले खुर्द तीन, म्हसवड दोन, किरकसाल, लोधवडे, बिदाल, दानगीरवाडी, आंधळी, पळशी, बिदाल, धावडी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव आठ, रहिमतपूर सहा, सुर्ली, एकसळ, बोरगाव, नागझरी, गोवेवाडी प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात मामुर्डी एक, वाई तालुक्यात वाई शहर, बावधन प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात पाचगणी तीन, खंडाळा तालुक्यातील खंडाळा, विंग, सुखेड, लोहोम प्रत्येकी एक, इतर सात, बाहेरील जिल्ह्यांमधील एक, असे 134 जण बाधित आहेत.
दरम्यान, सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना दरे ब्रद्रुक, ता. सातारा येथील 66 वर्षीय पुरुष व खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना कुंभरोशी, ता. महाबळेश्वर येथील 85 वर्षीय पुरुष, अशा दोन बाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.