पिंपरी – शहरामध्ये आज 121 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे आतापर्यंतची एकूण करोनाबाधितांची संख्या 87,996 झाली आहे. सोमवारी 119 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी चार वाजेपर्यंत शहरातील 121 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये शहराबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 3 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील एक व शहराबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत शहरात 1026 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 177 रुग्णांचाही समावेश आहे.
दिवसभरात 1738 संशयितांना तपासणीसाठी दाखल करण्यात आले. अद्याप 1623 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.