महापालिका वर्धापन दिनावर आचारसंहितेचे सावट

आज ३८ व्या वर्षांत पदार्पण : अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मोजकेच कार्यक्रम

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महपालिका येत्या शुक्रवारी महापालिकेचा आज 37 वा वर्धापन दिन आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या भरगच्च कार्यक्रमांना यंदा फाटा देण्यात आला आहे. वर्धापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी काही मोजकेच कार्यक्रम घेतले जाणार आहे.

महापालिका भवनासमोरील प्रांगणात असलेल्या अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्याला शुक्रवारी सकाळी दहा वाजता आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. त्यानंतर रक्‍तदान शिबीर आणि ऐच्छिक नेत्रदानाचे अर्ज भरून घेतले जाणार आहे. तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संगीत खुर्ची आणि रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्‍त संतोष पाटील, अतिरिक्‍त आयुक्‍त अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी महापालिका वर्धापन दिनानिमित्त अभिरूप सभा, आर्केस्ट्रा, कवी संमेलन, विविध स्पर्धा आदींचे नियोजन केले जाते. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. तसेच, निवडणूक कामकाजासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती झालेली आहे. त्यामुळे यंदा वर्धापन दिन मोजक्‍याच कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.