भाजपचे कार्याध्यक्ष नड्डा यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था

नवी दिल्ली -भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांना झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) कमांडो तैनात असतील. नड्डा यांच्या सुरक्षेला असणाऱ्या संभाव्य धोक्‍यात झालेली वाढ विचारात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने संबंधित निर्णय घेतला.

त्यामुळे नड्डा यांना सतत चोवीस तास सुरक्षा पुरवण्यासाठी आळीपाळीने एकूण 35 कमांडो तैनात राहतील. एकाच वेळी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी 8 ते 9 कमांडो सांभाळतील. नड्डा यांच्यासाठी देशभरात संबंधित सुरक्षाव्यवस्था उपलब्ध असेल.

त्याशिवाय, नड्डा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सीआरपीएफचे जवानही तैनात असतील. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने शहा यांचा भार हलका करण्यासाठी नड्डा यांच्या रूपाने कार्याध्यक्षपदाची व्यवस्था केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here