अन्‌ मिलिंद सोमनला ‘पापाजी’ म्हणत केले ट्रोल

भारतातील सुपर मॉडल आणि अभिनेता मिलिंद सोमन त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान पत्नी अंकिता या कॅम्पेनचे ब्रँड अ‍ॅम्बिसीडर बनलेत. मिलिंद 53 वर्षांचा असून अंकिता 28 वर्षांची आहे.


गतवर्षी दोघांनी लग्न केले. अर्थात वयाच्या अंतरावरून मिलिंद व अंकिता ट्रोलही झालेत. पण दोघांनीही याची कधीच पर्वा केली नाही. नुकतेच मिलिंद व अंकिता त्यांच्या रिलेशनशिपवर बोलले. यावेळी त्यांनी सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सच्या कमेंट्सलाही उत्तरे दिलीत. यादरम्यानचा दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. व्हिडीओत मिलिंद व अंकिता एकमेकांशेजारी बसलेले आहेत आणि  सोशल मीडियावरच्या कमेंट्स वाचत आहेत. मिलिंद एका युजरची कमेंट वाचतो. ‘अंकिता तू मिलिंदला पापाजी म्हणायला हवेस,’ अशी कमेंट्स मिलिंद वाचतो. ही कमेंट् वाचल्याबरोबर मिलिंद हसतो आणि अंकिता अनेकदा मला ‘पापाजी’ म्हणून हाक मारते, असा खुलासा करतो.

तत्पूर्वीलवकरच प्राइम ओरिजिनल “फोर मोर शॉट्‌स प्लीज’ या वेब सीरीजमधून पदार्पण करणार आहे. लग्नानंतर मिलिंदचा हा पहिलाच प्रोजक्‍ट असून त्याचे प्रशंसक पुन्हा एकदा त्याचा दमदार अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहेत.


“फोर मोर शॉट्‌स प्लीज’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून दर्शकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात शहरातील धावता जीवनातील भावनात्मक प्रवास दाखविण्यात आला आहे. यात मिलिंद हा एका डॉक्‍टरची भूमिका साकारत आहे. मिलिंदला पहिल्यांदाच अशा भूमिकेत पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.