मुंबई – प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये तिच्या पतीसोबत दिसली. या अवॉर्ड शोसाठी अंकिताने असे कपडे परिधान केले होते की तिला या फॅशनल कपड्यांमध्ये स्वःताला सांभाळणे कठीण झाले. अंकिताला या कपड्यांमुळे oops moments ऊप्स मोमेंटला सामोरे जावे लागले.
View this post on Instagram
अंकिता लोखंडे नुकतीच पती विकी जैनसोबत एका इव्हेंटमध्ये पोहोचली. या कार्यक्रमात तिने हिरव्या रंगाचा सुंदर चमकदार ड्रेस परिधान केला होता. पण या ड्रेसचा गळा इतका खोल गेला होता की तिला गाडीतून उतरतांना अडचण झाली. होय, अंकिता लोखंडे कारमधून खाली उतरणार इतक्यात तिने तिच्या गाऊनला हात लावला. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अंकिताला जोरदार ट्रोल करत आहेत.
View this post on Instagram
अंकिताने दाखवले घर
विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांचे गेल्या वर्षी १४ डिसेंबर रोजी लग्न झाले होते. दोघांनीही हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पाडलं. अलीकडेच या अंकिताने तिच्या घरात प्रवेश केला. या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अंकिताने चाहत्यांना तिच्या 8 BHK घराची झलक दाखवली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अंकिता लोखंडेच्या पोस्टला उत्तर देताना एकता कपूरने ‘ये प्यारी अर्चना से अलग’ असे लिहिले. याशिवाय तिच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटाची सहअभिनेत्री कंगना राणावतने लिहिले, ‘किती सुंदर.’ त्याचवेळी एका इंस्टाग्राम यूजरने लिहिले, ‘व्वा मॅडम! तुमची जोडी परिपूर्ण दिसते! तुम्ही दोघे खरोखर एकमेकांसाठी बनलेले आहात. अंकिता – विकीने अलीकडेच ‘स्मार्ट जोडी’ या रिअॅलिटी शोचे शीर्षक जिंकले आहे. दोघांनाही २५ लाख रुपये मिळाले होते.