मुंबई – अनिल कपूर (Anil kapoor) यांनी दमदार अभिनय, डायलॉग आणि सतरंगी डान्समुळे आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमामुळे ते सध्या चर्चेत आहे. यानंतर आता अनिल कपूर औरंगजेबाच्या हे ‘छावा’ या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनिल कपूर औरंगजेबाच्या दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
‘छावा’ या सिनेमाच्या टीमने औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अनिल कपूर यांना विचारण्यात केली आहे. या सिनेमात विकी कौशलसोबत अनिल कपूर दिसणार आहे. या सिनेमात विकी कौशल संभाजी महाराजांच्या तर रश्मिका त्यांच्या पत्नीच्या अर्थात येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ते एकत्र स्क्रीनवर दिसणार आहेत. शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा आहे. मराठ्यांचा गौरव आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर आधारित हा सिनेमा असणार आहे.
‘छावा’ या सिनेमाच्या शूटिंगला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार असून 2024 पर्यंत या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, विकी कौशलचे यावर्षात ‘जरा हटके जरा बचके’ आणि ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता त्याचा ‘सैम बहादुर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आता अभिनेता त्याच्या आगामी ‘छावा’ सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या सिनेमानंतर आता त्यांचा हा ऐतिहासिक चित्रपट सुपरहिट ठरणार का? हे पाहावे लागणार आहे.