Tujhe Yaad Na Meri Aayee Remix : अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांचा कुछ कुछ होता है हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप आवडतो. या चित्रपटातील शाहरुख आणि काजोलच्या जोडीने चाहत्यांची मने जिंकली होती. चित्रपटाच्या कथेपासून ते गाण्यांपर्यंत सगळंच अप्रतिम होतं.
हा चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता. करण जोहरने या चित्रपटातील तुझे याद ना मेरी आयी या गाण्याच्या रिमिक्सची घोषणा केली आहे. करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटातून करणने दिग्दर्शनात पदार्पण केले. कुछ कुछ होता है या गाण्याच्या रिमिक्सच्या घोषणेवर चाहते संतापले आहे.
करण जोहरने मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून गाण्याच्या रिमिक्सची घोषणा केली. त्याने कुछ कुछ होता है चे पोस्टर शेअर केले ज्यावर लिहिले होते, ‘तुझे याद ना मेरी आई चे रिमिक्स लवकरच येत आहे. हे पोस्टर शेअर करताना करणने लिहिले- वर्जन 2.0..’
या गाण्याचे रिमिक्स बी प्राक यांनी गायले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. बी प्राकने लिहिले होते,’जर तुम्ही मनापासून स्वप्न पाहिले तर ते स्वप्न प्रकट होऊ लागते आणि खरे ठरते. शाहरुख खान सर, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्यासाठी गाण्याचा मान मला मिळाला हे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मला आशा आहे की हे गाणे पुन्हा तयार करण्यासाठी आमची मेहनत आणि प्रयत्न तुम्हाला आवडतील.’
बी प्राकने असेही सांगितले की, ‘त्यांनी करणला या गाण्याचे रिमिक्स बनवण्यास सांगितले होते. बी प्राकने लिहिले, माझी विनंती स्वीकारल्याबद्दल आणि या जादुई गाण्याला आम्ही न्याय देऊ शकू यावर विश्वास ठेवल्याबद्दल करण जोहरचे आभार…’
बी प्राकच्या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंट केल्या. या पोस्टवर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका यूजरने लिहिले,’सर, यात काहीतरी नवीन आणा. दुसर्याने लिहिले,’ सुंदर गाणे खराब करू नका.’
तुझे याद ना मेरी आयी या गाण्याबद्दल सांगायचे तर ते उदय नारायण, अलका याज्ञिक आणि मनप्रीत अख्तर यांनी गायले आहे. हे गाणे आजही सर्वात लोकप्रिय हार्टब्रेक गाण्यांपैकी एक आहे.